चेहऱ्यावरील मुरुम, पिंपल आणि डाग कसे हटवायचे | How to Remove Pimple Spots From Face Naturally in Marathi

Chehryavarl murum, pimples aani dag kase hatvayche


मुरुम आणि पिंपल ही त्वचेची एक सामान्य समस्या आहे जी विशेषतः किशोरवयीन आणि तरुणांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. यामुळे चेहरा डागाळतो, आत्मविश्वास कमी होतो आणि कधी कधी वेदना होतात. या लेखात आम्ही मुरुम आणि पिंपल्सच्या समस्येचे कारणे, त्यासाठीचे आहारातील बदल, त्वचेवरील उपाय, आणि काही विशेष टिप्स याबद्दल सविस्तर माहिती देऊ.

चेहऱ्यावर मुरुम आणि पिंपल येण्याचे कारणे

मुरुम आणि पिंपलच्या समस्येची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • खराब पाचनतंत्र: खराब पाचनतंत्रामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर न पडता त्वचेतून ते बाहेर येतात आणि त्यामुळे मुरुम आणि पिंपल्स तयार होतात.
  • हार्मोन्सचे असंतुलन: किशोरवयीन मुलांमध्ये हार्मोन्समधील बदलांमुळे त्वचेत तेलाची निर्मिती जास्त होते, ज्यामुळे मुरुम तयार होतात.
  • तेलकट त्वचा: तेलकट त्वचा धूळ आणि घाण सहजपणे आकर्षित करते, ज्यामुळे त्वचेत बॅक्टेरियाचे संक्रमण होऊ शकते.
  • स्किन इन्फेक्शन: त्वचेवर बॅक्टेरियाचे संक्रमण झाल्यास मुरुम आणि पिंपल्स होऊ शकतात.
  • अनुवांशिकता: काही लोकांच्या कुटुंबात मुरुम आणि पिंपल्सची समस्या अनुवांशिक असते.
  • आहारातील त्रुटी: जास्त प्रमाणात तेलकट आणि मसालेदार अन्न सेवन केल्यास मुरुम आणि पिंपल्सची समस्या वाढते.

आहारातील बदल

आपण आहारात थोडा बदल करून मुरुम आणि पिंपल्स कमी करू शकतो. पौष्टिक आणि त्वचेसाठी फायदेशीर असा आहार तुमच्या मुरुम आणि पिंपल्सची समस्या कमी करण्यास मदत करू शकतो. खालील पदार्थ तुमच्या रोजच्या जेवणात समाविष्ट करा:

कद्दूचे बी: कद्दूचे बी झिंक, आयर्न, प्रोटीन आणि फायबरचे उत्तम स्रोत आहेत. रोज जेवणानंतर एक चमचा कद्दूचे बी खा. यामुळे शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची पूर्तता होते.

अळशीचे बी: अळशीचे बी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडने समृद्ध असतात. हे बी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि मुरुमांची समस्या कमी होते.

कॅड लिव्हर ऑइल: कॅड लिव्हर ऑइल विटामिन-डी आणि विटामिन-एचे उत्तम स्रोत आहे. हे ऑइल नियमित सेवन केल्याने मुरुम आणि त्वचेच्या अन्य समस्यांवर नियंत्रण मिळते.

गाजर आणि पालकाचा रस: रोज नाश्त्याबरोबर गाजर आणि पालकाचा रस पिला पाहिजेत. यात विटामिन-ए, विटामिन-डी, आयर्न आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात.

दालचिनी आणि ग्रीन-टी: दालचिनी आणि ग्रीन-टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. रोज ग्रीन-टी पिणे आणि दालचिनी पावडर मधासोबत सेवन केल्याने रक्तशुद्धी होते.

फळे आणि भाज्या: रोज सलाडमध्ये फळे आणि भाज्या जास्तीत जास्त खा. रताळे, कमळाची जड, गाजर आणि चुकंदर यांचा समावेश करा. आंवला आणि अ‍ॅलोवेरा रस देखील उपयुक्त असते.

त्वचेवरील उपाय

चेहऱ्यावर मुरुम आणि पिंपल्स कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय उपयुक्त ठरतात:

नीम आणि तुळशीचा पेस्ट:

सामग्री: कडुलिंबाची पाने, तुळशीचे पान, मुलतानी माती, नीम तेल.

कृती: नीम आणि तुळशीची पाने पाण्यात धुवून मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये एक चमचा मुलतानी माती आणि अर्धा चमचा नीम तेल मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर पिंपल्स असलेल्या ठिकाणी लावा. 10-15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. ह्या उपायाचा आठवड्यातून तीन ते चार वेळा उपयोग करा.

टी ट्री ऑइल:

सामग्री: टी ट्री ऑइल, मध.

कृती: थोड्याश्या मधात टी ट्री ऑइलचे काही थेंब मिसळा. हे मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी पिंपल्स असलेल्या ठिकाणी लावा आणि सकाळी थंड पाण्याने धुवा. टी ट्री ऑइलमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेला स्वच्छ आणि निरोगी ठेवतात.

ताजे अ‍ॅलोवेरा जेल:

सामग्री: ताजे अ‍ॅलोवेरा.

कृती: ताजे अ‍ॅलोवेरा जेल पिंपल्स असलेल्या ठिकाणी लावा. 10-15 मिनिटांनी चेहरा धुवा. अ‍ॅलोवेरामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि मुरुमांची समस्या कमी होते.

चेहऱ्यावरील मुरुम, पिंपल आणि डाग हटवण्यासाठी विशेष टिप्स

मुरुम आणि पिंपल्सच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी खालील काही विशेष टिप्स पालन करा:

चेहऱ्याला हाताने स्पर्श करू नका: मुरुम फोडणे किंवा चेहऱ्याला हात लावणे टाळा करण यामुळे बॅक्टेरिया पसरू शकते आणि मुरूम जास्त वाढू शकते.

चेहरा नियमित धुवा: रोज दोन ते तीन वेळा चेहरा धूत राहावे. यामुळे चेहऱ्यावरील तेल आणि घाण निघून जाईल. चेहरा धुण्यासाठी सौम्य फेस वॉशचा वापर करा.

स्वच्छ टॉवेल वापरा: चेहरा पूसण्यासाठी वेगळा टॉवेल वापरा. दोन दिवसांनी टॉवेल धुवा. चेहरा पुसताना टॉवेलने हलक्या हाताने पुसा.

उन्हात जाणे टाळा: चेहरा उन्हात गेल्यावर झाकून ठेवा म्हणजेच उन्हात गेल्यावर चेहरा बांधून जा. उन्हामुळे आणि धुळीमुळे मुरुम वाढतात. तसेच घराबाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा.

पाणी जास्त प्या: दिवसातून किमान 3 लीटर पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते आणि त्वचेला ताजेतवाने बनवते.

केसांना तेल कमी लावा: चेहऱ्यावर मुरुम येण्यामागील मुख्य कारण म्हणजे  तेलकट त्वचा. जे लोकं केसांना जास्त तेल लावतात आणि ज्या लोकांचे केस नेहमी नेमही कपाळावर येत राहतात तर अशा स्थितीत कपाळावर लवकर मुरूम पसरू लागतात. जोपर्यंत मुरूम बरे होत नाहीत तोपर्यंत केसांना तेल कमीच लावावे.

डॉक्टरांचा सल्ला घ्या: टीव्ही, इंटरनेट किंवा वर्तमानपत्रांवर दाखवले जाणारे कोणतेही औषध किंवा क्रीम विकत घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि तसेच कोणतीही क्रीम तुम्हाला चेहऱ्यावर लावायची असेल तर ती डॉक्टरांकडूनच घ्यावी.

त्वचेची काळजी

मुरुम आणि पिंपल्सची समस्या असताना त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे:

  • स्वच्छता: चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित फेस वॉशचा वापर करा.
  • मेकअप टाळा: जास्त मेकअपचा वापर टाळा. मेकअप हटवताना सौम्य क्लींजर वापरा.
  • व्यायाम: नियमित व्यायाम करा. नियमित व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा निरोगी राहते.
  • संतुलित आहार: आहारात फळे, भाज्या, प्रोटीन आणि फायबरचा समावेश करा.
  • तणाव टाळा: तणावामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात, ज्यामुळे मुरुमांची समस्या वाढते. तणाव कमी करण्यासाठी ध्यान, योगा किंवा तणावमुक्त करणाऱ्या क्रिया करा.

निष्कर्ष

मुरुम आणि पिंपल्सच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य आहार, त्वचेवरील घरगुती उपाय आणि काही विशेष टिप्सचे पालन करणे महत्त्वाचे आहे. या लेखातील माहितीचा अवलंब केल्यास नक्कीच तुम्हाला मुरुम आणि पिंपल्सपासून सुटका मिळेल आणि चेहऱ्यावर नवे तेज येईल. जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने