![]() |
Home Remedies to Cleanse Kidneys in Marathi |
किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे जो रक्त शुद्ध करण्याचे काम करतो. जसं आपण यकृत आणि पोटाच्या स्वच्छतेला महत्त्व देतो, त्याचप्रमाणे किडनीही वेळोवेळी स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. किडनी स्वच्छ न केल्यास विषारी पदार्थांचे प्रमाण वाढू लागते, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. या पोस्टमध्ये आपण किडनी स्वच्छ करण्याचे महत्त्व, किडनी खराब होण्याची लक्षणे आणि किडनी साफ होण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय याबद्दल सविस्तर बघणार आहोत.
किडनी स्वच्छ करणे महत्वाचे आहे का?
किडनी खराब होण्याची लक्षणे
किडनी खराब होण्याची लक्षणे अनेक असू शकतात जसे-
- चेहऱ्यावर सूज
- पायात आणि घोट्यात सूज येणे
- लघवीत बदल होणे जसे लघवीचा रंग, वास, आणि प्रमाण
- पोट दुखणे
- त्वचेवर खाज सुटणे आणि पुरळ उठणे
- नेहमी थकवा राहणे
- भूक न लागणे
जर यापैकी कोणतेही एक लक्षण दिसत असेल तर लगेच डॉक्टर शी संपर्क साधा.
किडनीची काळजी कशी घ्यावी? किडनी साफ करण्यासाठी ७ सर्वोत्तम घरगुती उपाय
मक्याच्या कणसाचे केस (Corn Silk)
उपयोग:
- मक्याच्या कणसाचे केस सुकून घ्या
- सुमारे ५० ग्रॅम केस दोन ग्लास पाण्यात १०-१५ मिनिटे उकळा.
- हे पाणी गाळून घ्या आणि जेवणानंतर ३०-४० मिनिटांनी दिवसातून २-३ वेळा प्या.
- १५ ते २० दिवसांनी ही प्रक्रिया पुन्हा करा.
टरबूजाच्या बिया
टरबूजच्या बियांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, मॅग्नेशियम आणि झिंक असते, जे किडनी स्वच्छ करण्यास तसेच मधुमेह नियंत्रित करण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, निरोगी त्वचा आणि पुरुषांमध्ये होणारी लैंगिक कमजोरी दूर करण्यास मदत करतात.
उपयोग:
- दोन चमचे टरबूजाच्या बियांची पावडर बनवा.
- दोन ग्लास पाण्यात हि पावडर उकळा.
- ते पाणी थंड झाल्यावर याला गाळून दिवसातून २-३ वेळा प्या.
- आठवड्यातून एकदा या ड्रिंकचे सेवन करा.
मुळ्याची पाने
किडनीमध्ये जमा झालेले विषारी घटक साफ करण्यासाठी मुळ्याची पाने खूप उपयुक्त आहेत. मुळ्याची पाने एक उत्कृष्ट डिटॉक्स एजंट आहेत आणि हे मुळ्याची पाने मूळव्याध आणि कावीळ सारख्या रोगांवर देखील फायदेशीर आहेत.
उपयोग:
- मुळ्याच्या पानाचा रस काढा.
- हफ्त्यामध्ये या रसाचे दोन वेळा सेवन करा.
लिंबू आणि सफरचंदाचे व्हिनेगर
उपयोग:
- एका ग्लास पाण्यात एक लिंबाचा रस आणि एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळा.
- याला रोज सकाळी उपासी पोटी प्या.
अजवाइन च्या बिया
उपयोग:
- एक चमचा अजवाइनच्या बिया एका ग्लास पाण्यात उकळा.
- थंड झाल्यावर गाळून प्या.
- या पाण्याला दिवसातून एकदा प्या.
कोथिंबीर आणि पुदिना
एक ग्लास पाण्यात मूठभर कोथिंबीर आणि पुदिना उकळा.
थंड झाल्यावर हे पाणी गाळून प्या.
आठवड्यातून २/३ वेळा हे पाणी प्या.
नारळ पाणी
उपयोग:
रोज एक ग्लास नारळ पाणी प्या, नारळ पाणी किडनी साठी फायदेशीर असते.
किडनी स्वच्छ करण्यासाठी इतर महत्वाच्या टिप्स
- पुरेसे पाणी प्या: दररोज किमान ८/१० ग्लास पाणी प्या.
- संतुलित आहार घ्या: फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त आहार घ्या.
- धूम्रपान आणि अल्कोहोल टाळा: हे किडनीच्या आरोग्यास हानी पोहोचवतात.
- नियमित व्यायाम करा: व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे किडनीचे कार्य वाढते.
- तणाव टाळा: तणाव घेणे टाळा कारण तणावामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो.