या प्रोटीन पाउडर आणि डाइट प्लान ने फक्त ७ दिवसात बॉडी बनवा
ही पोस्ट खासकरून त्या लोकांसाठी आहे जे जिममध्ये जाऊन बॉडी बनवण्यात गुंतलेले आहेत. बरेच लोकं शरीर बनवण्यासाठी सप्लिमेंट्सचा वापर करतात, अशा सप्लिमेंट्समुळे शरीर तर बनते पण हे दीर्घकाळ वापरल्यास त्यांचे शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात. हे सप्लिमेंट्स इतके महाग असतात की सामान्य लोक ते विकत घेऊ शकत नाहीत. जर तुम्हाला तुमचे शरीर खरोखरच बनवायचे असेल, तर या पोस्टमध्ये सांगितलेले उपाय फक्त 7 दिवस फॉलो करा. तुम्हाला १००% परिणाम मिळतील कारण अनेक जिम जाणाऱ्यांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्याचा त्यांना फायदा सुद्धा झाला आहे.
७ दिवसतात बॉडी बनवण्याचे उपाय
घरीच प्रोटीन पावडर कशी तयार करावी?
प्रोटीन पावडर तयार करण्यासाठी तुमाला खालील साहित्याची आवश्यकता आहे-
- 100 ग्रॅम बदाम
- 100 ग्रॅम अक्रोड
- 50 ग्रॅम ओट्स (बार्ली दलिया)
- 50 ग्रॅम दूध पावडर
- 100 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे
- 2 टीस्पून चिया बियाणे
- 100 ग्रॅम भोपळ्याच्या बिया
- ५ वेलची (चवीनुसार)
- 1 चमचा अश्वगंधा पावडर
या सगळ्या साहित्यांना एक एक करून बारीक पावडर करून घ्या आणि एकत्र करून मिसळून घ्या, या मिश्रणाला एक पॅकबंद डब्यात ठेवा जेणेकरून त्यात हवा जाणार नाही.
प्रोटीन पावडरचे सेवन कसे करावे?
- एक ग्लास दूध गरम करा.
- त्यात ३/४ चमचा हि प्रोटीन पावडर मिसळा.
- त्यात थोडासा गूळ टाका (हा प्रोटीन शेक टेस्टी बनण्यासाठी)
- आत हा शेक पिण्यासाठी तयार.
लक्षात असुद्या, हि प्रोटीन पावडर जिम वरून आल्यावरच प्यायची आहे, या प्रोटीन पावडर ने तुमच्या शरीरावर कोणताही साईट इफेक्ट होणार नाही.
डाइट प्लान: आरोग्य चांगले राहण्यासाठी काय खावे
अनेकदा जीममध्ये जाणारे लोक योग्य आहार घेत नाहीत ज्यामुळे त्यांचे शरीर बनत नाही. वर्कआउट केल्यानंतर, स्नायूंमधील अंतर वाढते आणि तसेच शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे, स्नायू दुरुस्त होऊ शकत नाहीत. स्नायू पुनर्प्राप्त करण्यासाठी आणि स्नायूंचा आकार वाढविण्यासाठी प्रोटीन, फॅट आणि कर्बोदकांचे सेवन आवश्यक आहे. या घरगुती प्रोटीन पावडरमध्ये प्रोटीन, फॅट आणि कार्ब्स सोबतच फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, जस्त, जीवनसत्त्वे, खनिजे आणि लोह देखील असतात. या पावडर सोबतच चांगला आहार घेणेसुद्धा आवश्यक आहे.
७ दिवसांचा डाईट प्लॅन
या प्रोटीन पाउडर आणि डाइट प्लान ने फक्त ७ दिवसात बॉडी बनवा. या डायट प्लॅन ला सतत घेतल्याने ७ दिवसात ४ किलो वजन वाढेल आणि हा प्लॅन वापरून बघिलेला आहे. प्लॅन पुढीलप्रमाणे-
- सकाळी 6:30: दूध आणि गव्हाची लापशी, सुका मेवा.
- सकाळी 9:00: चार ब्राऊन ब्रेड, पीनट बटर आणि केळी शेक.
- दुपारी 1:00: चार चपात्या, भात, सलाड, दही.
- संध्याकाळी 4:00pm: चार ब्राऊन ब्रेड, पीनट बटर आणि बनाना शेक.
- संध्याकाळी 7:00: जूस आणि पनीर.
- रात्री 9:00: चार चपात्या तुपासोबत आणि सलाड.
- रात्री 10:00: 1 लिटर दूध आणि 10-12 भिजवलेले बदाम.
७ दिवसांचा डाईट प्लॅनची सविस्तर माहिती
सकाळी 6:30: दूध आणि गव्हाची लापशी, सुका मेवा
तुमची सकाळची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने व्हायला हवी. दूध आणि गव्हाची लापशी तुम्हाला ऊर्जा देईल आणि ड्रायफ्रूट तुम्हाला आवश्यक विटामिन आणि मिनरल्स देतील. लापशीमध्ये फायबर असते जे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवते.
सकाळी 9:00: चार ब्राऊन ब्रेड, पीनट बटर आणि केळी शेक
यावेळी केला जाणारा नास्ता तुमच्या शरीराला प्रोटीन आणि एनर्जी देतो. ब्राऊन ब्रेड आणि पीनट बटर प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स चा एक चांगला स्रोत आहे. बनाना शेक तुमच्या शरीराला कार्बोहाइड्रेट्स आणि पोटैशियम प्रदान करेल जे तुमच्या शरीरात मांसपेशींना फायदेशीर असते.
दुपारी 1:00: चार चपात्या, भात, सलाड, दही
दुपारचे जेवण संतुलित आणि त्यात भरपूर पोषक तत्वे असावे. चपाती आणि तांदूळ मधून कार्बोहायड्रेट्स मिळतात, सॅलडमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे (मिनरल्स) मिळतात आणि दहीमधून प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स मिळतात.
संध्याकाळी 4:00pm: चार ब्राऊन ब्रेड, पीनट बटर आणि बनाना शेक
संध्याकाळच्या नास्त्यामध्येसुद्धा तुम्हाला प्रोटीन आणि ऊर्जाची आवश्यक असते. हा तोच नाश्ता आहे जो तुम्ही सकाळी ९:०० वाजता केला होता, जो तुमच्या शरीराला नियमित अंतराने प्रोटीन आणि ऊर्जा प्रदान करेल.
संध्याकाळी 7:00: जूस आणि पनीर
संध्याकाळची वेळ म्हणजे हलका नाश्ता करण्याची वेळ असते. ज्युसमधून तुम्हाला आवश्यक जीवनसत्त्वे आणि मिनरल्स मिळेल आणि पनीरमधून तुम्हाला प्रोटीन मिळेल ज्यामुळे तुमचे स्नायू तयार करण्यास मदत करेल.
रात्री 9:00: चार चपात्या तुपासोबत आणि सलाड
रात्रीचे जेवण हलके असले तरी पोषक तत्वाने भरपूर असावे. तुम्हाला चपाती आणि तुपातून आवश्यक चरबी आणि सॅलडमधून जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतील.
रात्री 10:00: 1 लिटर दूध आणि 10-12 भिजवलेले बदाम
रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि बदाम घेतल्याने तुमचे स्नायू दुरुस्त आणि बरे होतात. दुधात कॅल्शियम आणि प्रोटीन असते आणि बदाम मध्ये व्हिटॅमिन-ई आणि मॅग्नेशियम असते.
निष्कर्ष
जर तुम्ही तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी या आहाराचा अवलंब केला तर अवघ्या ७ दिवसात तुमचे ४ ते ५ किलो वजन वाढेल असा माझा दावा आहे. तुम्हाला काही समजले नसेल तर कमेंट करा आणि समजले तर तुमच्या मित्रांना व्हाट्सॲप आणि फेसबुक वर शेअर करा. धन्यवाद.